५ ऑनलाइन रिटेलर्सना आयकर विभागाच्या नोटिसा

मुंबईस्थित तीन साडी रिटेलर्सनी सेलिब्रेटींचा समावेश असलेला फॅशन शो आयोजित केल्यानंतर ऑनलाइन रिटेलर्स आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत.
५ ऑनलाइन रिटेलर्सना आयकर विभागाच्या नोटिसा

मुंबई : फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि व्हॉट्सॲॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून दागिने, फुटवेअर, बॅगा तसेच गिफ्टच्या वस्तूंची विक्री करून तब्बल १० हजार कोटींचा कर थकवल्याप्रकरणी आयकर विभागाने तब्बल ४५ ई-कॉमर्स आणि ऑनलाइन रिटेलर्सना नोटिसा पाठवल्या आहेत. छोटेसे दुकान किंवा गोदाम असलेल्या ऑनलाइन रिटेलर्सनी १०० कोटींचा ऑनलाइन व्यवहार केला असून त्यांनी फक्त २ कोटींचे आयटी रिटर्न्स भरले आहे. यूपीआयद्वारे झालेल्या व्यवहारांची तपासणी करून या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मुंबईस्थित तीन साडी रिटेलर्सनी सेलिब्रेटींचा समावेश असलेला फॅशन शो आयोजित केल्यानंतर ऑनलाइन रिटेलर्स आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in