रेल्वे हद्दीत सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री प्रकरणी १,१५० प्रकरणात ५ लाखांचा दंड वसूल; मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा -२००३ रेल्वेच्या आवारात कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थाच्या वापराच्या गुन्ह्याशी संबंधित आहे
रेल्वे हद्दीत सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री प्रकरणी १,१५० प्रकरणात ५ लाखांचा दंड वसूल; मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई
PM

मुंबई : सिगारेट तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विरोधात मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने कारवाईचा बडगा उगारला आहे. भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४५ आणि सिगारेट तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांअंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ११५० प्रकरणे नोंदवली आहेत आणि ४.९६ लाख रूपये दंड वसूल करण्यात आला.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत, रेल्वे सुरक्षा बलाच्या मुंबई विभागाने कलम १४५-ए, बी आणि सी अंतर्गत ६३९ प्रकरणे नोंदवली आणि ३ लाख ९३ हजार ८३० रुपये इतकी रक्कम दंड म्हणून वसूल केली. याव्यतिरिक्त सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा -२००३ अंतर्गत गुन्ह्यांची ५११ प्रकरणे नोंदवण्यात आली. एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १ लाख ०२ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. नोव्हेंबर २०२३ मध्ये, रेल्वे सुरक्षा बलाने, मुंबई विभागात, सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा २००३ अंतर्गत गुन्ह्यांची ८४ प्रकरणे नोंदवली असून त्यामार्फत १६ हजार ८०० रुपये दंड वसूल केला.

सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा -२००३ रेल्वेच्या आवारात कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थाच्या वापराच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान नेहमीच तत्पर असतात आणि मुंबई विभाग रेल्वे सुरक्षा बलाने आपली शिस्त आणि कायद्याच्या अंमलबजावणीचे उत्कृष्ट उदाहरण वरील कामगिरीसह ठेवले आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in