'टीबी' रुग्णांना सकस, पोषण आहार, पोषण आहार योजनेंतर्गत ५०० रुपयांची मदत,पालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती

गेल्या वर्षभरात ५३,४०८ टीबीची लागण झालेल्या रुग्णांच्या बँक खात्यात प्रती रुग्ण प्रमाणे ७.४ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
'टीबी' रुग्णांना सकस, पोषण आहार, पोषण आहार योजनेंतर्गत ५०० रुपयांची मदत,पालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती

गिरीश चित्रे /मुंबई

टीबीची लागण झालेल्या रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासह त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. सृदृढ आरोग्यासाठी टीबीच्या रुग्णांना पोषण आहार योजनेंतर्गत प्रति रुग्ण ५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. गेल्या वर्षभरात ५३,४०८ टीबीची लागण झालेल्या रुग्णांच्या बँक खात्यात प्रती रुग्ण प्रमाणे ७.४ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

टीबीमुक्त मुंबई यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येतात. २०२५ पर्यंत टीबीमुक्त मुंबईसाठी संशयित रुग्णांचा शोध घेत टीबीचे निदान झालेल्या रुग्णावर वेळीच उपचार करणे शक्य होते. औषधोपचारासह रुग्णांच्या सृदृढ आरोग्यासाठी पोषण आहार योजनेंतर्गत टीबी रुग्णांच्या बँक खात्यात ५०० रुपये प्रति महिना जमा करण्यात येतात. टीबी रुग्णांच्या बँक खात्यात जमा होणारे ५०० रुपये रुग्ण टीबीवर मात करेपर्यंत देण्यात येतात, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

टीबी रुग्णांच्या बँक खात्यात प्रती रुग्ण ५०० रुपयेप्रमाणे ५३,४०८ एकूण लाभार्थी असून प्रति महिना याप्रमाणे एकूण रुपये ७.४ कोटी रुपये आतापर्यंत क्षय रुग्णांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. ही माहिती केंद्र शासनाच्या निक्षय प्रणालीवरून घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

'असा' होतो उपचार

क्षय रुग्णावर उपचार सुरू झाल्यानंतर औषध संवेदनशील क्षय रुग्णांसाठी सहा महिन्यांनंतर व फुप्फुसेतर क्षय रुग्णांसाठी ९ महिन्यांनंतर तेसच औषधप्रतिरोधी क्षय रुग्णांसाठी दोन वर्षांनंतर देण्यात येते.

पोषण आहारात डाळ, भात, चिकन करी!

मांसाहारी रुग्णांसाठी अतिरिक्त उच्च प्रथिने आहारात चार चपात्या, भात, डाळ, उसळ (सर्व रुग्णांसाठी आठवड्यातून दोनदा) ६० ग्रॅम चिकन असलेली चिकन करी यांचा समावेश आहे. शाकाहारी रुग्णांसाठी अतिरिक्त उच्च प्रथिने आहार पनीर देण्यात येते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in