
मुंबई : सणासुदीच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी भारतभर तब्बल १,७०० ट्रेन प्रवासी सेवेत धावत आहेत. यापैकी मध्य रेल्वेने तब्बल ५१५ उत्सव विशेष ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या असून, गेल्या वर्षी २७० ट्रेन चालवण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २४५ ट्रेन जादा सोडल्या असून, ७.५० लाख अतिरिक्त प्रवाशांनी प्रवास केला आहे.
सणासुदीच्या हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दरवर्षी उत्सव विशेष ट्रेन प्रवाशांच्या सेवेत चालवण्यात येतात. प्रवाशांच्या प्रवास आरामदायी व्हावा याच बरोबर प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते.
सीसीटीव्ही कॅमेरे, कुशल कर्मचारी तैनात!
गर्दीच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रवाशांना प्रत्यक्ष वेळेत मदत करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे कंट्रोल रूममध्ये कुशल आरपीएब कर्मचारी तैनात केले आहेत.
युटीएस काउंटरमध्ये वाढ!
मुंबई विभागात पूर्वी सुमारे ६९१ युटीएस काउंटर होते. नोव्हेंबर महिन्यापासून ते ८०३ युटीएस काउंटर वाढवले आहेत