फ्लॅटच्या आमिषाने व्यापाऱ्याची ५३ लाखांची फसवणूक

काही महिन्यांपूर्वीच त्यांना करणसिंगने अशाच प्रकारे अनेक लोकांकडून फ्लॅटच्या नावाने पैसे घेतल्याचे समजले होते
फ्लॅटच्या आमिषाने व्यापाऱ्याची ५३ लाखांची फसवणूक

मुंबई : फ्लॅटच्या आमिषाने व्यापाऱ्याची सुमारे ५३ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार प्रभादेवी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी करणसिंग भाटी या आरोपीविरुद्ध दादर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. करणसिंग हा पळून गेला असून त्याने फ्लॅटच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. प्रभादेवीतील तक्रारदाराला स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमीष दाखवत करणने त्यांच्याकडून ५३ लाख ५० हजार रुपये घेतले होते. लवकरच फ्लॅटचे कागदपत्रे बनवून त्यांना फ्लॅटचा ताबा देतो, असे सांगून त्याने फ्लॅटचे कागदपत्रे दिली नाही. काही महिन्यांपूर्वीच त्यांना करणसिंगने अशाच प्रकारे अनेक लोकांकडून फ्लॅटच्या नावाने पैसे घेतल्याचे समजले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दादर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी करणसिंग भाटीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंतच्या चौकशीत त्याने अनेकांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in