गुंतवणुकीच्या नावाने वयोवृद्धाची ५५ लाखांची फसवणूक

या बांधकामासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांनी त्यांच्याकडून ५५ लाखांची गुंतवणूक केल्यास १८० दिवसांत त्यांना ६५ लाख रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते.
गुंतवणुकीच्या नावाने वयोवृद्धाची ५५ लाखांची फसवणूक

मुंबई : गुंतवणुकीच्या नावाने एका वयोवृद्धाची सुमारे ५५ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कार्तिकभाई तलाटी आणि सतीश सभाजीत पांडे या दोन भामट्याविरुद्ध एमएचबी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून यातील सतीश हा व्यवसायाने बिल्डर असल्याचे पोलिसांनी सांगितले. बोरिवली परिसरात राहणारे ७४ वर्षांचे तक्रारदार महापालिकेतून निवृत्त झाले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांची कार्तिक आणि नंतर सतीश पांडे यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर कार्तिकने त्यांना सतीश पांडे हा बिल्डर असून, प्रोजेक्टमध्ये त्याला चांगले गुंतवणुकदाराची गरज असून, गुंतवणुकीवर चांगले कमिशन मिळेल, असे सांगितले होते. कार्तिकभाईच्या सांगण्यावरून त्यांनी सतीश पांडेची भेट घेतली होती. या भेटीत त्याने त्यांना त्याची बोरिवलीतील कान्हेरी व्हिलेजजवळ गुंफा दर्शन या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांनी त्यांच्याकडून ५५ लाखांची गुंतवणूक केल्यास १८० दिवसांत त्यांना ६५ लाख रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. सहा महिन्यांत दहा लाख रुपयांचे व्याज मिळत असल्याने त्यांनी सतीश पांडेकडे गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांनी सतीशला ५५ लाख रुपये दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in