नवरात्रोत्सवात वाहन विक्रीत ५७ टक्के वाढ

यंदा नवरात्रोत्सवाचा कालावधी २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर हा होता. तर २०२१मध्ये हा कालावधी ६ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होता
नवरात्रोत्सवात वाहन विक्रीत ५७ टक्के वाढ
Published on

फेडरेशन ऑफ अॅटोमोबाईल डीलर्स असोसिएशन अर्थात फाडाने प्रथमच नवरात्रोत्सवातील वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे नवरात्रोत्सवातील वाहन विक्रीत तब्नबल ५७ टक्के वाढ झाली, अशी माहिती ‘फाडा’चे प्रेसिडेंट मनिष राज सिंघानिया यांनी दिली.

ते म्हणाले की, सर्व वर्गवारीत उत्तम वृद्धीदर आहे. यंदा नवरात्रोत्सवाचा कालावधी २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर हा होता. तर २०२१मध्ये हा कालावधी ६ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होता. यंदा नवरात्रौत्सवात ५,३९,२२७ वाहनांची विक्री झाली असून गेल्या वर्षी वरील कालावधीत हा आकडा ३,४२,४५९ युनिटस‌् इतका होता. त्यापैकी ५.३९ लाख वाहनांपैकी प्रवासी वाहनांची संख्य १,१०,५२१ युनिटस‌् तर दुचाकींची संख्या ३,६९,०२० युनिटस‌् इतकी होती.

logo
marathi.freepressjournal.in