Mumbai Trains : रेल्वे सुरक्षा दलाकडून ९ महिन्यात ६२ प्रवाशांना जीवनदान

मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी "मिशन जीवन रक्षक" अंतर्गत जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावर स्वतःचा जीव धोक्यात घालून आतापर्यंत
Mumbai Trains : रेल्वे सुरक्षा दलाकडून ९ महिन्यात ६२ प्रवाशांना जीवनदान

उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रवाशांचा बेजबाबदारपणा विविध घटनांतून उघडकीस येत आहे. धावती लोकल पकडणे, चालत्या लोकलमधून उतरणे अथवा आत्महत्येचा प्रयत्न करणे. यामुळे त्या प्रवाशासोबत इतर प्रवाशांचा जीवही अनेकवेळेस धोक्यात येण्याच्या घटना घडल्या आहेत. हीच बाब लक्षात घेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी "मिशन जीवन रक्षक" अंतर्गत जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मध्य रेल्वे मार्गावर स्वतःचा जीव धोक्यात घालून आतापर्यंत ६२ जणांचे प्राण वाचवले आहेत.

रेल्वे संरक्षण दलाकडे प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका आणि ट्रेन तसेच रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी सुरक्षा आव्हाने असतात. याचवेळेस रेल्वे संरक्षण दलाकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्याचे काम देखील केले जाते. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने गेल्या ९ महिन्यांत (जानेवारी ते सप्टेंबर २०२२) ६२ प्रवाशांचे जीव वाचवले आहेत. तर मागील वर्षी म्हणजेच २०२१ या वर्षात मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी ५२ प्रवाशांचे प्राण वाचवले होते. दरम्यान, बहुतेक प्रकरणांमध्ये सतर्क रेल्वे पोलिसांनी अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. तर काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करतात. अशा स्थितीत रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांचे जीव वाचवण्यात आले असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in