धक्कादायक! मुंबईत 64 वर्षीय महिलेवर बलात्कार, गुप्तांगावर वार करुन रस्त्याच्या कडेला फेकले; 38 वर्षीय आरोपीला अटक

धक्कादायक! मुंबईत 64 वर्षीय महिलेवर बलात्कार, गुप्तांगावर वार करुन रस्त्याच्या कडेला फेकले; 38 वर्षीय आरोपीला अटक

आरोपीने पीडितेला मारहाण तर केलीच, शिवाय गुप्तांगांवर आणि शरिराच्या इतर अवयवांवरही अमानुष वार केल्याने पीडिता अर्धमेली झाली. यानंतर आरोपीने पीडितेला रस्त्याच्या कडेला फेकून घटनास्थळावरुन पळ काढला. पीडितेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई हे महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर मानले जाते. मात्र, मागील काही काळापासून मुंबईत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 64 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेनंतर आरोपीने पीडितेला मारहाण तर केलीच, शिवाय गुप्तांगांवर आणि शरिराच्या इतर अवयवांवरही अमानुष वार केल्याने पीडिता अर्धमेली झाली. यानंतर आरोपीने पीडितेला रस्त्याच्या कडेला फेकून घटनास्थळावरुन पळ काढला. पीडितेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवत आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबुर येथील माहुल गावात राहणारी महिला सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास आपल्या घरी जात होती. यावेळी रिक्षातून आलेल्या आरोपी उमेश गुलाबराव ढोक (वय 38) याने तिच्या घरी सोडतो असे सांगितले. तो पीडितेच्या घराजवळ राहत असल्याने ती देखील त्याच्यासोबत जायला तयार झाली. स्वतःचे घर आल्यावर आरोपी रिक्षातून उतरला, त्याने काही बहाणा करीत पीडितेलाही त्याच्या घराजवळच उतरण्याची विनंती केली. त्याच्या घरी नेल्यानंतर त्याने पीडितेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याला विरोध केला असताना त्याने तिला अमानुषपणे मारहाण करायला सुरुवात केली.आरोपीकडून महिलेवर कथितपणे अनेकवेळा बळजबरी केली गेली. यानंतर त्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास पीडितेला रस्त्याच्या कडेला टाकून पळ काढला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास स्थानिकांना पीडिता रस्त्याच्या कडेला अर्धनग्न आणि जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पीडितेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी पीडितेची ओळख पटवून तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. पीडित विधवा महिला मानखुर्द येथील बाजारपेठेत मासे विकून चेंबूरच्या माहुल गावातील एका अपार्टमेंटमध्ये आपल्या मुलीसह राहत होती. दरम्यान, पीडित महिलेच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी उमेशविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 376 (2) (एन) (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार), 325 (स्वेच्छेने गंभीर दुखापत करणे), 323 (स्वेच्छेने इजा पोहोचविणे) आणि 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक अपमान करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला मानखुर्द परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत

चौकशीदरम्यान, पोलिसांना आरोपीवर २०१७ साली अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा खटला सुरु असल्याचे आढळून आले. भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354 (अ), 354 (ब) ,506 (2), 323 पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in