
मुंबई : सुमारे ६५ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गेल्या तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या वैशाली विश्वनाथ विचारे या आरोपी अकाऊंट महिलेस बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. कामगाराच्या पेमेंटच्या पैशांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याचा वैशालीवर आरोप असून, याच गुन्ह्यांत तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.
यातील वृद्ध तक्रादार मालाड येथे राहत असून त्यांची एक सुरक्षारक्षक पुरविण्याची कंपनी आहे. या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी वैशाली विचारे हिच्यावर होती. कंपनीत कामाला असताना वैशालीने २०११ ते २०२२ या अकरा वर्षांत तिच्यासह तिच्या पती आणि भावाच्या बँक खात्यात कर्मचाऱ्यांच्या पेमेंटच्या नावाने काही रक्कम ट्रान्स्फर केली होती.
इतकेच नव्हे, तर काही जुन्या सुरक्षारक्षकांची बोगस नावे टाकून त्यांचे नाव लिस्टमध्ये टाकून त्यांना पेमेंट केल्याचे दस्तावेज बनविले होते. वैशाली ही तिच्यासह तिचा पती आणि भावाच्या बँक खात्यात नियमित पैसे ट्रान्स्फर केले होते. गेल्या अकरा वर्षांत तिने सुमारे ९५ लाख रुपयांचा परस्पर अपहार करून कंपनीची फसवणूक केली होती.