मुंबईत १० दिवसांत ६८ रेस्टॉरंट‌्सची झाडाझडती: एकाला काम थांबवण्याची नोटीस; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

थर्टीफर्स्ट आणि नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी मुंबईकरांसह पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईत विविध ठिकाणी भेट देतात.
मुंबईत १० दिवसांत ६८ रेस्टॉरंट‌्सची झाडाझडती:  एकाला काम थांबवण्याची नोटीस; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

मुंबई : थर्टीफर्स्ट आणि नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी मुंबईकरांसह पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईत विविध ठिकाणी भेट देतात. यात चांगल्या चुंगल्या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक हॉटेल रेस्टॉरंटमध्ये येतात. मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत कुठलाही प्रकाराची समस्या निर्माण होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने १० दिवसांत ६८ रेस्टॉरंट‌्सची झाडाझडती घेतली. यात एका रेस्टॉरंटला स्वच्छता, खाद्यपदार्थांचा दर्जा राखण्याची सूचना एफडीएने केली आहे. दरम्यान, ६८ रेस्टॉरंट‌्समधून एकूण ५३ ठिकाणचे नमुने जमा करण्यात आले. हे नमुने एफडीएच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तर, फक्त एका रेस्टॉरंटला व्यवसाय थांबवण्याची सूचना एफडीएने केली आहे.

स्वच्छतांचे निकष न पाळल्याने सुधारणा करण्याच्या सूचना

६७ रेस्टॉरंट्समध्ये स्वच्छतेचे निकष पाळले गेले नव्हते. म्हणून त्यांंना सुधारणा सुचना दिल्या गेल्या. तर, एका रेस्टॉरंटला काम थांबवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in