मुंबईच्या गोरेगामध्ये  इमारतीला लागलेल्या आगीत ७ जणांचा होपळून मृत्यू ; तर ३९ जणांची प्रकृती चिंताजनक

मुंबईच्या गोरेगामध्ये इमारतीला लागलेल्या आगीत ७ जणांचा होपळून मृत्यू ; तर ३९ जणांची प्रकृती चिंताजनक

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची आर्थिक मदत तसंच जखमींवर शासकीय खर्चातून उपचार करणार - मुख्यमंत्री

मुंबईतील गोरेगाव भागात मध्यरात्रीच्या सुमारास एका इमारतीच्या पार्किंगमध्ये आग भडकल्याचा प्रकार समोर आला. या भीषण आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अग्निशमन दलाने ४६ जणांना बाहेर काढलं आहे. यातील ३९ जणांवर कूपर आणि हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. अग्निशमन दलाला सध्या या आगीवर नियंत्रण मिळवायला यश आलं आहे. त्यांच्याकडून आता कुलिंगच काम सुरु आहे. दरम्यान, आग नेमकी कोणत्या कारणाने लागली. याचं कारण अद्याप समोरं आलं नाही.

मध्यरात्रीच्या सुमासार लागलेल्या याआगीमुळे परिसात एकच खळबळ उडाली. यानंतर अग्निशमन दलाने शर्थीच्या प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं असून याठिकाणी आता कुलिंगचं काम सुरु आहे. स्थानिक पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून आग नेमकी कोणत्या कारणाने लागली. याचा शोध घेतला जात आहे. गोरेगावच्या पश्चिम भागात असलेल्या जी रोड वरील जय भवानी इमारतीला आग लागली होती. G+5 इमारतीमध्ये लागलेली आग ही लेव्हल टू ची होती. ही आग मध्यरात्रीच्या वेळी लागल्याने अनेक जण झोपेत होते. त्यामुळे काही कळायच्या आत यात होरपळून मृत्यू झाला.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, या आगीतून बाहेर काढलेल्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच बरोबर या आगीत इमारतीच्या तळमजल्यावरील काही दुकान आणि वाहनं जळून खाक झाली आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी या घटनेवर ट्विट करत घडलेली घटना ही अत्यंत दुर्देवी असल्याचं सांगत मृतांप्रती आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यात बरोबर आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आमि पोलील आयुक्तांकडून वेळोवेळी माहिती घेत असल्याचं सांगितलं. याच बरोबर मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं आहे.

त्याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आगीत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लांखांची आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींवर सरकारी खर्चाने वैद्यकीय उपचार करण्यात येतील असं देखील सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in