आरे मद्रास पाडा येथे ७० आसनी स्वच्छतागृह ; युनिट ७ मधील रहिवाशांची गैरसोय दूर

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आरे यूनिट ७ मधील मद्रास पाडा येथे ७० आसनी स्वच्छतागृह बांधण्यात आले
आरे मद्रास पाडा येथे ७० आसनी स्वच्छतागृह ; युनिट ७ मधील रहिवाशांची गैरसोय दूर

आरे मद्रास पाडा येथील युनिट ७ मध्ये मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तळ अधिक एक असे ७० आसनी स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली असून युनिट ७ मधील तीन हजारांहून अधिक रहिवाशांची गैरसोय दूर झाल्याचे भाजपच्या स्थानिक नगरसेविका प्रिती सातम यांनी सांगितले. दरम्यान, भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते नुकतेच या स्वच्छतागृहाचे लोकार्पण झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरसेविका प्रीति सातम सातत्याने पाठपुराव्यामुळे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आरे यूनिट ७ मधील मद्रास पाडा येथे ७० आसनी स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. आधुनिक स्वच्छतागृहामुळे परिसरातील जवळपास तीन हजारांहून अधिक रहिवाश्यांना विशेषता महिला त्याचा लाभ होणार आहे. रहिवाशांनी प्रिती सातम यांचे मनापासून आभार मानले.

दरम्यान, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी प्रिती सातम भाजप विधानसभा अध्यक्ष अनंत परब व पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in