Mumbai : महालक्ष्मी मंदिरात ७७ CCTV ची नजर; नवरात्रोत्सवासाठी महालक्ष्मी मंदिराची सज्जता

सोमवारपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवासाठी मध्य मुंबईतील महालक्ष्मी मंदिराची सज्जता झाली असून, मंदिर परिसरात ७७ सीसीटीव्ही तैनात करण्यात आले आहेत.
Mumbai : महालक्ष्मी मंदिरात ७७ CCTV ची नजर; नवरात्रोत्सवासाठी महालक्ष्मी मंदिराची सज्जता
Published on

मुंबई : सोमवारपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवासाठी मध्य मुंबईतील महालक्ष्मी मंदिराची सज्जता झाली असून, मंदिर परिसरात ७७ सीसीटीव्ही तैनात करण्यात आले आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात ७७ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नवरात्रोत्सव काळात महालक्ष्मी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. या काळात मंदिर व्यवस्थापन समितीने वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाशी समन्वय साधला आहे.

मंदिर परिसरातील आंतरिक रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे वाहनतळ बंद होणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पुन्हा लाइन मार्गावर शृंखला हॉटेल ते शीतल स्टोअरपर्यंत रांगेचं नियोजन करण्यात आले आहे.

मंदिर विश्वस्त संस्थेने नवरात्रीच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. मंदिरात प्रवेश करताना प्रत्येकाला सुरक्षा तपासणीतून जावे लागणार असून मेटल डिटेक्टरमधून तपासणी केली जाणार आहे. प्रवेश काळात

मंदिर परिसरात माहितीफलक लावण्यात येणार आहेत. मंदिरात सकाळची पहिली आरती ६.३० वाजता, दुपारची आरती १२.३० वाजता, संध्याकाळी ५.३० ची आरती व शेवटची आरती रात्री ८.३० ला होणार आहे.

भाविकांसाठी सुविधा

मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची, वैद्यकीय सुविधा तसेच अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग, जेष्ठ नागरिक, महिलांसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in