मानखुर्द येथील भंगाराच्या ८ ते १० गोदामांना लागली आग

सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले
मानखुर्द येथील भंगाराच्या ८ ते १० गोदामांना लागली आग

मानखुर्द मंडाला येथील भंगाराच्या ८ ते १० गोदामांना गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ८ ते १० गोदामे जळून खाक झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

मानखुर्द, मंडाला भागातील २० फिट रोड, मातंग नगर येथील झोपडपट्टीत गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग २० मिनिटांत पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. काही वेळात आगीचा भडका उडाल्याने लेव्हल-२ची आग असल्याचे अग्निशमन दलाने जाहीर केले. अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केल्यावर आगीवर एक तासात नियंत्रण मिळवल्याने जीवितहानी टळली; मात्र आगीत भंगार गोदामे जळून खाक झाल्याचे अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आठ फायर इंजिन व चार जम्बो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने या आगीवर काही अवधीत नियंत्रण मिळविले. स्थानिक पोलीस व अग्निशमक दलाचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in