गोल्ड लोन योजनेद्वारे बँकेला ८२ लाखांचा गंडा

ऑगस्ट २०१९ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत गोल्ड लोन घेऊन कर्जाचे नियमित हप्ते न भरणाऱ्या खातेदारांची एक यादी बँकेने काढली होती
गोल्ड लोन योजनेद्वारे बँकेला ८२ लाखांचा गंडा

गोल्ड लोन योजनेद्वारे एका बँकेला सुमारे ८२ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी इलाबेन भरत मिस्त्री या आरोपी महिलेला मालाड पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर सहा जणांचा सहभाग उघडकीस आला आहे.

भाईंदरमध्ये राहणारे राहुल चंदू कोंडर मालाडच्या एका बॅकेत मॅनेजर आहेत. ऑगस्ट २०१९ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत गोल्ड लोन घेऊन कर्जाचे नियमित हप्ते न भरणाऱ्या खातेदारांची एक यादी बँकेने काढली होती. सपना भट्ट हिने खोटे दागिने देऊन गोल्ड लोन घेतले होते. तिच्याच मदतीने पुतिता राव, जितेंद्र भासेले, वैशाली भोसले, अंकित राणा, इलाबेन मिस्त्री, ज्योती केसकर यांनीही बँकेत बोगस दागिने देऊन गोल्ड लोन प्राप्त केले होते. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर राहुल कोंडर यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली.

logo
marathi.freepressjournal.in