घरे देण्याच्या नावाखाली ९,३८० कोटींचा घोटाळा

घरे देण्याच्या नावाखाली ९,३८० कोटींचा घोटाळा

माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवण्यात येत असून प्रकल्प बाधितांना घरे देण्याच्या नावाखाली ९,३८० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. पालिका मुख्यालयातील काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, मुलुंड, भांडुप, वरळी आदी ठिकाणी १४ हजार घरे बांधली जाणार होती. या प्रकल्पाची रेडी रेकनर नुसार मुळ किंमत ३२०० कोटी होती. परंतु पालिकेने विकासकांना प्रिमियम क्रेडिट नोट, भुखंड टीडीआर, कंन्स्ट्रकशन टिडीआर मधून बिल्डरला ९३८० हजार कोटींचा फायदा करून देण्यात आला आहे, असा आरोपही राजा यांनी केला आहे.

मुलुंड, भांडुप, वरळी आदी ठिकाणी १४ हजार घरे बांधली जाणार होती. या प्रकल्पाची रेडी रेकनर नुसार मुळ किंमत ३२०० कोटी होती. परंतु पालिकेने विकासकांना प्रिमियम क्रेडिट नोट, भुखंड टीडीआर, कंन्स्ट्रकशन टिडीआर मधून बिल्डरला ९३८० हजार कोटींचा फायदा करून देण्यात आला. हा पालिकेतील सर्वात मोठा भूखंड टीडीआर घोटाळा आहे. मुंबईकरांच्या पैशांची ही उधळपट्टी केली जात असल्याने या प्रकरणी लोकायुक्त, पालिका आयुक्त व सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनला पत्र दिले आहे. या प्रकरणी गरज पडल्यास न्यायालयात जाणार असल्याचे रवी राजा म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in