माहीम किल्ल्याला नवी झळाळी ;सुशोभीकरणासह विद्युत रोषणाईवर ९५ लाखांचा खर्च

मुंबईतील तब्बल ८०० वर्षे जुन्या माहीम किल्ल्यावर मोठ्याप्रमाणता अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण हटवून या किल्ल्याच्या वाटा मोकळ्या करण्यात आल्या आहे
माहीम किल्ल्याला नवी झळाळी ;सुशोभीकरणासह विद्युत रोषणाईवर ९५ लाखांचा खर्च
PM

मुंबई : ११४० ते ११४१ च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या माहीम किल्ल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच किल्ल्यावर सुशोभीकरणाचे हाती घेण्यात येणार आहे. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून, यासाठी मुंबई महापालिका तब्बल ९५ लाख रुपये खर्चणार आहे.

मुंबईतील तब्बल ८०० वर्षे जुन्या माहीम किल्ल्यावर मोठ्याप्रमाणता अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण हटवून या किल्ल्याच्या वाटा मोकळ्या करण्यात आल्या आहे. महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून या किल्ल्यावरील तब्बल २६७ झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या किल्ल्याचे जतन करण्यात येत आहे. अतिक्रमण हटल्यामुळे या किल्ल्यावर सामान्य जनतेला जाण्याचा मार्गही खुला झाला असून, सर्व प्रकारच्या डागडुजीचे काम पूर्ण झाल्या पर्यटकांसाठी हा किल्ला खुला केला जाणार आहे.

हा किल्ला अतिक्रमण मुक्त करण्यात आल्यानंतर शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि माहिमचे आमदार सदा सरवणकर यांनी पुढाकार घेत या किल्ल्याचे सौदर्य वाढवून पर्यटकांचे आकर्षण ठरावा या दृष्टीने माहीम किल्ल्याचा कायापालट करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केसरकर यांनी निधी मंजूर करून महापालिकेला उपलब्ध करून दिला आहे. या मंजूर निधीतून माहिम किल्ल्याच्या विद्युत रोषणाईचे काम हाती घेण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in