यकृत प्रत्यारोपणाद्वारे १४ वर्षांच्या मुलाला नवजीवन

प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी सुरतमधील खासगी रुग्णालयातून मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे यकृत आणण्यात आले.
यकृत प्रत्यारोपणाद्वारे १४ वर्षांच्या मुलाला नवजीवन

मुंबई : मुंबईच्या ‘नानावटी मॅक्स हॉस्पिटल’मध्ये १४ वर्षांच्या एका मुलावर यकृत प्रत्यारोपण करून त्याचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. सुरत येथील एका १८ महिने वयाच्या मुलाचा मेंदू-मृत्यू झाला, तेव्हा त्याचे यकृत काढून मुंबईत १४ वर्षांच्या मुलावर त्याच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. हा मुलगा नाशिकचा रहिवासी असून त्याला एक दुर्मिळ अनुवांशिक विकार असल्याचे निदान झाले होते. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी सुरतमधील खासगी रुग्णालयातून मुंबईतील नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे यकृत आणण्यात आले. त्याकरिता २८१ किमी अंतराचा आंतरराज्य ‘ग्रीन कॉरिडॉर’ स्थापन करण्यात आला. ४ तास २० मिनिटांत यकृताची वाहतूक झाल्यानंतर नानावटी मॅक्स हॉस्पिटल येथे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया विभागाचे संचालक डॉ. अनुराग श्रीमाळ आणि पेडियाट्रिक हेपॅटोलॉजी विभागाचे संचालक डॉ. विभोर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी हे प्रत्यारोपण केले.

logo
marathi.freepressjournal.in