लग्नाच्या आमिषाने १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

ओळखीनंतर त्यांची मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.
लग्नाच्या आमिषाने १५ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : लग्नाच्या आमिषाने एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच प्रियकराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून २४ वर्षांच्या आरोपी प्रियकराला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत मुलगी ही गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहत असून, काही महिन्यांपूर्वीच तिची आरोपी तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांची मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

५ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत त्याने त्याच्याच नातेवाईकाच्या घरी तिच्यावर तिच्या मनाविरुद्ध अत्याचार केले होते. त्यातून ही मुलगी गरोदर राहिली होती. हा प्रकार समजताच तिच्या आईला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने शिवाजीनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in