१६ वर्षांच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, प्रियकराला झाली अटक

१६ वर्षांच्या मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कफ परेड परिसरात उघडकीस आली आहे.
१६ वर्षांच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, प्रियकराला झाली अटक

मुंबई : १६ वर्षांच्या मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कफ परेड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद होताच आरोपी प्रियकर अंकित मंडल याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मच्छींदर यांनी दुजोरा दिला आहे.

४४ वर्षांची तक्रारदार महिला कफ परेड परिसरात राहते. तिचे पहिले लग्न झाले असून, त्याच्यापासून तिला दोन मुली आहेत. याच परिसरात राहणाऱ्या अंकित मंडलसोबत तिच्या १६ वर्षांच्या मुलीचे प्रेमसंबंध होते. १९ जानेवारीला सायंकाळी तिच्या १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर तिने तिच्या मोठ्या मुलीला विचारणा केली असता, तिचे अंकितसोबत प्रेमसंबंध होते; मात्र तिला त्यांच्यातील प्रेमसंबंध पुढे ठेवायचे नव्हते. त्यामुळे ती अंकितसोबत बोलत नव्हती. तरीही अंकित तिच्याशी जबदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करत होता. ती बोलत नसल्याने त्याने तिला मारहाण केली होती. त्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in