मानखुर्द येथे अपघातात २१ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

चेंबूर येथे देवीचे विसर्जन झाल्यानंतर रोहन, अजय आणि साई बावस्कर असे तिघेही बाईकवरुन घरी जाण्यासाठी निघाले.
मानखुर्द येथे अपघातात २१ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

मुंबई : मानखुर्द येथील अपघातात रोहन शंकर पाटील या २१ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र जखमी झाले. याप्रकरणी अजय विजय बावस्कर या आरोपी मित्राविरुद्ध गोवंडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. भरवेगात बाईक चालविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे. शंकर आकाराम पाटील हे मनखुर्द परिसरात राहत असून, ते क्रॉफर्डमार्केट येथे हमालीचे काम करतात. मृत रोहन हा त्यांचा मुलगा असून, तो तुर्भे येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्या परिसरात असलेल्या साईनाथ गोविंदा पथकाने देवीच्या मूर्तीची स्थापना केली होती. शुक्रवारी देवीचे विसर्जन असल्याने रोहन हा त्याचा मित्र अजय बावस्कर याच्यासोबत विजर्सनासाठी त्याच्या बाईकवरुन गेला होता. चेंबूर येथे देवीचे विसर्जन झाल्यानंतर रोहन, अजय आणि साई बावस्कर असे तिघेही बाईकवरुन घरी जाण्यासाठी निघाले. ही बाईक रात्री दिड वाजता मानखुर्द येथील शीव-पनवेल हायवे, नॉर्थ बॉण्डवरुन जात असताना अजयचा भरवेगात बाईक चालविण्याच्या नादात नियंत्रण सुटले आणि त्यांच्या बाईकचा अपघात झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in