अपघातात २८ वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू

रात्री सव्वाच्या सुमारास शीव ब्रिजवरुन जाताना त्याच्या बाईकला कचरा साफ करणाऱ्या एका गाडीने जोरात धडक दिली
अपघातात २८ वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू

शीव येथील अपघातात एका २८ वर्षीय बाईकस्वाराचा मृत्यू झाला. अजिंक्य हेमंतकुमार वरळीकर असे या मृत बाईकस्वाराचे नाव असून, त्याच्या मृत्यूप्रकरणी संतोषकुमार रामसनई जैस्वाल या चालकास शीव पोलिसांनी अटक केली. हा अपघात रविवारी रात्री सव्वाच्या सुमारास शीव ब्रिजवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हेमंतकुमार भास्कर वरळीकर हे वरळीतील पाखारी गल्ली, सोनाबाई सदनमध्ये राहत असून, ते रेल्वेमध्ये सिनिअर सेक्शन इंजिनिअर म्हणून कामाला आहेत. मृत अजिंक्य हा त्यांचा मुलगा आहे. रविवारी सायंकाळी तो त्यांच्या नातेवाईकांच्या लग्न कार्यासाठी शीव परिसरात गेला होता. कार्यक्रम संपल्यानंतर तो त्याच्या बाईकवरून शीव येथून वरळीच्या दिशेने जात होता. रात्री सव्वाच्या सुमारास शीव ब्रिजवरुन जाताना त्याच्या बाईकला कचरा साफ करणाऱ्या एका गाडीने जोरात धडक दिली होती. या अपघातात अंजिक्य हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in