पार्टटाईम नोकरीच्या बहाण्याने २९ वर्षांच्या तरुणाची फसवणूक

या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पार्टटाईम नोकरीच्या बहाण्याने २९ वर्षांच्या तरुणाची फसवणूक
Published on

मुंबई : पार्टटाईम नोकरीच्या बहाण्याने एका २९ वर्षांच्या तरुणाची सुमारे पावणेदहा लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार सांताक्रुझ परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून वाकोला पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरू केला आहे. सांताक्रुझ येथे तक्रारदार तरुण राहत असून तो विक्रोळीतील एका कंपनीत कामाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या सोशल अकाऊंटवर पार्टटाईम नोकरीची एक जाहिरात आली होती. त्यामुळे त्याने त्याची माहिती तिथे पाठविली होती. या माहितीनंतर त्याला काही लिंक पाठवून व्हिडीओला लाइक करण्याचे काम देण्यात आले होते. व्हिडीओ लाइक केल्यानंतर त्याला काही कमिशनची रक्कम मिळाली होती. या आमिषाला बळी पडून त्याने ८ जानेवारी ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत विविध टास्कसाठी सुमारे पावणेदहा लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र त्यानंतर कोणतीही रक्कम न मिळाल्याने त्याने समोरील व्यक्तीला संपर्क केला. पण कोणताही प्रतिसाद मिळू न लागल्याने त्याने वाकोला पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in