डम्परच्या धडकेत ३६ वर्षांच्या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

मृत व्यक्तीचे नाव मंगेश बाळासाहेब कांबळे असून त्याची पत्नी स्वाती मंगेश कांबळे हिच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डम्परच्या धडकेत ३६ वर्षांच्या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

मुंबई : डम्परच्या धडकेत एका ३६ वर्षांच्या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. मृत व्यक्तीचे नाव मंगेश बाळासाहेब कांबळे असून त्याची पत्नी स्वाती मंगेश कांबळे हिच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी डम्परचालकाविरुद्ध समतानगर पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविला आहे. अपघातानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसाकडून शोध सुरू आहे. रविवारी हे दोघे मोटारसायकलवरून घरी येत असताना, दुपारी चार वाजता कल्पतरू इमारतीसमोर त्यांना डम्परने धडक दिली होती. त्यात ते दोघेही जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही जखमी पती-पत्नींना शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे मंगेश कांबळे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर स्वातीला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in