
मुंबई : फिनेल प्राशन करून एका ४७ वर्षांच्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार वाकोला पोलीस ठाण्याच्या आवारात घडला. या घटनेने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. खुमनसिंह गेलोत असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आले. वरिष्ठांना तक्रार अर्जासंदर्भात भेटू दिले नाही म्हणून मानसिक नैराश्यातून त्याने फिनेल प्राशन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.