कारच्या धडकेत ७५ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू

उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच मलबार हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
कारच्या धडकेत ७५ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू

मुंबई : कारच्या धडकेने एका ७५ वर्षांच्या वृद्धाचा मृत्यू झाला. राजेश पटेल असे या वयोवृद्धाचे नाव असून, त्यांच्या मृत्यूप्रकरणी क्रिश माधव मानेकलाल या चालकास मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. रोहन आभाष पटेल हे मलबार हिल येथे राहत असून, ते स्टॉक एक्स्चेंजचे काम करतात. मृत राजेश हे त्याचे चुलते आहेत. मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पावणेपाच वाजता राजेश हे कामानिमित्त बाहेर गेले होते. वाळकेश्वर येथील बँक ऑफ बडोदा बसस्टॉपच्या दिशेने जाताना रस्ता क्रॉस करत असताना भरवेगात जाणाऱ्या एका कारने त्यांना धडक दिली होती. या अपघातात राजेश हे गंभीररीत्या जखमी झाले होते. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने जवळच्या भाटिया रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मांडीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच मलबार हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रोहन पटेल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालक क्रिश मानेकलाल याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका वृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in