भाजप आमदाराच्या घरासमोर आढळली पैशांनी भरलेली बॅग

प्रसाद लाड यांच्या माटुंगा येथील घराबाहेर सुरक्षारक्षकाला बॅग आढळून आली.
भाजप आमदाराच्या घरासमोर आढळली पैशांनी भरलेली बॅग
Published on

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर एक बॅग सापडली असून त्यात सोने, चांदीच्या मूर्ती आणि रोख रक्कम सापडली आहे. सुरुवातीला या बॅगमध्ये नेमके काय आहे, यावरून परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते; मात्र नंतर यात पैसे आणि सोने, चांदी सापडल्यानंतर ही बॅग कुणाची आहे, त्याने ही बॅग प्रसाद लाड यांच्या घरासमोर का टाकली, याचे कारण अद्याप उमगलेले नाही.

प्रसाद लाड यांच्या माटुंगा येथील घराबाहेर सुरक्षारक्षकाला बॅग आढळून आली. त्याने याबाबतची माहिती प्रसाद लाड यांना दिली. पहाटे कुणीतरी ही बॅग सोडून पसार झाले असावे, असे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. दरम्यान, अशाप्रकारे आमदारांच्या घरासमोर बॅग ठेवल्याने संशय व्यक्त केला जात आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या घरासमोर सापडलेल्या बॅगमध्ये पैसे, सोने, चांदी, तसेच चांदीच्या मूर्ती असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लाड यांचे घर माटुंगा परिसरात आहे. आमदारांच्या घराला सुरक्षा असताना अशाप्रकारे बॅग सापडणे याकडे संशयाने बघितले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in