सौदी अरेबियाला जाणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला अटक

बोगस भारतीय दस्तावेजाच्या मदतीने त्याने भारतीय पासपोर्ट मिळविले होते. याच पासपोर्टवर तो नोकरीच्या उद्देशाने सौदीला जात होता.
सौदी अरेबियाला जाणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला अटक
Published on

मुंबई : बोगस भारतीय पासपोर्टवर सौदी अरेबियाला जाणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली. पासपोर्टवर बांगलादेशच्या शिक्क्यावरून तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले, त्यानंतर त्याला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहम्मद शाहीन रज्जाक गाझी असे या बांगलादेशी नागरिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी सकाळी पाच वाजता मोहम्मद शाहीन हा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदी अरेबियाला जाण्यासाठी आला होता. यावेळी त्याने त्याचा पासपोर्टसह तिकिट आणि बोर्डिंग पास सादर केले होते. त्याच्या पासपोर्टवर तो बांगलादेशात जाऊन आल्याची नोंद होती. त्यामुळे त्याची इमिग्रेशन अधिकार्‍यांनी चौकशी केली असता तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. बांगलादेशी नागरिक असताना त्याने भारतात वास्तव्यास असताना भारतीय निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड आणि आधारकार्ड बनविले होते. याच बोगस भारतीय दस्तावेजाच्या मदतीने त्याने भारतीय पासपोर्ट मिळविले होते. याच पासपोर्टवर तो नोकरीच्या उद्देशाने सौदीला जात होता.

logo
marathi.freepressjournal.in