बोरिवलीत भिक्षेकरूची गळफास घेऊन आत्महत्या

बोरिवलीत भिक्षेकरूची गळफास घेऊन आत्महत्या

या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले

मुंबई : बोरिवली येथे एका ३५ वर्षांच्या भिक्षेकरूची बनियान आणि शर्टच्या सहाय्याने नो पार्किंग बोर्डाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. नायर नावाचा एक भिक्षेकरू दिवसा भिक मागून तो रात्रीच्या वेळेस तिथेच झोपत होता. सोमवारी रात्री उशिरा त्याने बोरिवलीतील एस. व्ही. रोडवरील पोलीस लॉकअपजवळील एका नो पार्किंग बोर्डाला गळफास लावून आत्महत्या केली होती.

मंगळवारी पहाटे पाच वाजता हा प्रकार उघडकीस येताच एका नागरिकाने ही माहिती बोरिवली पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यामुळे त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. नायर हा मुंबईत एकटाच राहत होता. त्याचे कोणीही नातेवाईक नाही. त्यामुळे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in