वांद्रे मेट्रो लाईनखाली ‘बॉलीवूड थीम’ चित्रपटसृष्टीचा १०० वर्षांचा इतिहास उलगडणार

उद्योग-व्यवसाय आणि देशाच्या अर्थकारणामध्ये मोठे योगदान देणाऱ्या बॉलीवूडचा गेल्या १०० वर्षांचा प्रचंड मोठा इतिहास हा या परिसराशी जोडलेला आहे
वांद्रे मेट्रो लाईनखाली ‘बॉलीवूड थीम’ चित्रपटसृष्टीचा १०० वर्षांचा इतिहास उलगडणार

मुंबई : वांद्रे पश्चिम येथून जाणाऱ्या मेट्रो लाईन २-बीच्या खाली ईएसआयसी नगर ते वांद्रे दरम्यान ७ स्टेशन व त्यामधील ३५५ खांब व त्यामधील जागेमध्ये एमएमआरडीएमार्फत शिल्प, एलईडी दिवे, डिजिटल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून बॉलीवूड थीम साकारण्यात येणार आहे. त्याद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीचा गेल्या १०० वर्षांचा इतिहास उलगडून दाखवण्यात येणार आहे. अत्यंत अनोखी अशी ही कल्पना या परिसराचे सौंदर्य तर वाढविणारी ठरणार आहेच शिवाय ती पर्यटकांचे खास आकर्षण ठरेल, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आणि स्थानिक आमदार ॲॅड. आशिष शेलार यांनी दिली.

वांद्रे पश्चिम येथे असणारे बॅन्ड स्टँड, माऊंट मेरी आणि अन्य चर्च, वांद्रे किल्ला, जुन्या आठवणी जपणारे वांद्रे रेल्वे स्टेशनसह हा संपूर्ण परिसर पर्यटकांचे आकर्षण ठरणारा आहे. बॉलीवूडमधील अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्री, कलावंत, लेखक, गायक, चित्रपट निर्माते याच भागात वास्तव्यास असून पाली हिल, कार्टर रोड या परिसरात फिल्मस्टार यांना पाहायला येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच रेलचेल राहते. उद्योग-व्यवसाय आणि देशाच्या अर्थकारणामध्ये मोठे योगदान देणाऱ्या बॉलीवूडचा गेल्या १०० वर्षांचा प्रचंड मोठा इतिहास हा या परिसराशी जोडलेला आहे. त्यामुळेच त्याला उजाळा देत या परिसरातून जाणाऱ्या मेट्रो लाईनचे खांब व त्यामधील जागा यावर विशेष पद्धतीने बॉलीवूड थीम साकारण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in