
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी अपघातात मृत्यू झाला. त्यांचा जीवनप्रवास थोडक्यात...
वयाच्या ४३ व्या वर्षी २०१२ साली ते टाटा समूहाचे अध्यक्ष बनले. २०१६ साली झालेल्या वादानंतर मिस्त्रींना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. १८८७ साली स्थापन झालेल्या टाटा सन्स ह्या टाटा समूहाच्या प्रमुख कंपनीचे अध्यक्ष होते. २०१२ ते ऑक्टोबर २०१६ दरम्यान ते या पदावर होते. टाटा सन्सचे १८ टक्के भांडवल हे सायरस यांच्या कुटुंबाच्या मालकीचे आहेत.
रतन टाटा सेवानिवृत्त झाल्यावर सायरस मिस्त्री यांनी २९ डिसेंबर २०१२ रोजी कार्यभार हाती घेतला. सायरस मिस्त्री आपल्या कुटुंबाच्या शापूरजी पालोनजी आणि कंपनीमध्ये १९९१ साली संचालक म्हणून दाखल झाले. सायरस यांचे त्यांचे वडील पालनजी मिस्त्री हे बांधकाम व्यवसायातील नामांकित व्यक्ती आहेत. सायरस मिस्त्रींची बहीणसुद्धा टाटा घराण्यातच दिलेली आहे.
सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी कुटुंबातील आहेत. शापूरजी हे पालोनजी समूहाच्या टाटा सन्सच्या होल्डिंग कंपनीतील सर्वात मोठे खासगी भागधारक आहेत. मिस्त्री यांची २००६ मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. इतर अनेक समूह कंपन्यांमध्येही त्यांनी नॉन-एक्झिक्युटिव्ह पदे भूषवली आहेत. मिस्त्री यांचा जन्म ४ जुलै १९६८ रोजी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये झाले. इम्पिरियल कॉलेज लंडनमधून त्यांनी सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून पदव्युत्तर पदवी (व्यवस्थापन) घेतली आहे. ते इन्िस्टट्यूशन ऑफ सिव्हिल इंजिनीअर्सशी संलग्न होते.
इक्बाल छागलांच्या मुलीशी लग्न
सायरस मिस्त्री पालोनजी मिस्त्री, उद्योगपती आणि पॅटसी पेरिन दुबाश यांचे सर्वात धाकटा मुलगा आहे. मिस्त्री प्रसिद्ध वकील इक्बाल छागला यांची मुलगी आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ एम. सी. छागला यांची नात रोहिका बागला यांच्याशी लग्न केले.
१९९१ नंतर शापूरजी पालोनजी ग्रुपला नवीन उंचीवर नेण्याचे श्रेय मिस्त्री यांना जाते. ते ब्रीच कँडी हॉस्पिटल ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत.
टाटा-मिस्त्री वाद
शापूरजी पालोनजी समूहाची टाटा सन्समध्ये १८.३७ टक्के भागीदारी आहे. रतन टाटा यांच्या जागी पालोनजी मिस्त्री यांचा मुलगा सायरस मिस्त्री यांना २०१२ मध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष बनवण्यात आले होते, परंतु चार वर्षांनंतर २०१६मध्ये त्यांना अचानक पदावरून हटवण्यात आले. तेव्हापासून त्यांचे टाटा समूहाशी मतभेद होते. हे प्रकरण कोर्टातही पोहोचले होते. न्यालयाने टाटा सन्सच्या बाजूने निकाल दिला होता.