डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट ; मालवणी आगारातील घटना

शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव
डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट ; मालवणी आगारातील घटना

मालवणी बस डेपोत उभ्या असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या वातानुकूलित इलेक्ट्रिक बसने पेट घेतला. शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, टाटा मोटर्स लिमिटेड ( टी एम एल ) या कंत्राटदाराची ही मिनी वातानुकूलित इलेक्ट्रीक बस होती.

ही बस ६३४७ (एम एच०२ - डीआर १८१०) बस क्रमांक ए ३५९ वर मालवणी आगार ते हिरानंदानी बस स्थानक [ पवई ] येथे जाऊन दुपारी १ वाजता परत आली होती. सकाळपासून ही बस ५३ किमी धावली होती, असे बेस्ट प्रशासनातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, या बसला आग कशी लागली या कारणांचा शोध बेस्टचे अधिकारी व टाटा मोटर्स लिमिटेड या कंत्राटदाराचे अधिकारी घेत आहेत

logo
marathi.freepressjournal.in