३६ लाखांमध्ये भंगार डंपरच्या विक्रीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

पैशांचा परस्पर अपहार करून या चौघांनी संबंधित डंपरचालकांची फसवणूक केली होती.
३६ लाखांमध्ये भंगार डंपरच्या विक्रीप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

मुंबई : सुमारे ३६ लाखांमध्ये भंगार डंपरची बोगस दस्तावेज बनवून विक्री करून फसवणूक करणाऱ्या एका टोळीच्या चौघाविरुद्ध आंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या आरोपींमध्ये रमजान मेहबूब शेख, सिंकदर जरीन शाह, फकरुद्दीन शेख आणि रेड्डी यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्यांतील चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. रमजान हा जोगेश्‍वरी परिसरात राहत असून तो काहीच कामधंदा करत नव्हता. त्यातच त्याने त्याच्या सहकार्‍यांच मदतीने भंगारात गेलेले काही डंपर स्वस्तात खरेदी केले होते. या डंपरची डागडुजी करून डंपरचे बोगस दस्तावेज बनविण्यात आले होते. ते डंपर नवीन असल्याचे भासवून त्यांनी गरजू लोकांना तीन डंपरची सुमारे ३६ लाखांमध्ये विक्री केली होती. या पैशांचा परस्पर अपहार करून या चौघांनी संबंधित डंपरचालकांची फसवणूक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in