सात कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी बिल्डरविरुद्ध गुन्हा

जयेश विनोद तन्ना या बिल्डरविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
सात कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी बिल्डरविरुद्ध गुन्हा
Published on

मुंबई : सुमारे सात कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी जयेश विनोद तन्ना या बिल्डरविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इमारत प्रोजेक्टसाठी व्याजाने घेतलेल्या पैशांच्या मोबदल्यात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून जयेशने एका महिलेसह तिच्या वृद्ध आईची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कांदिवली येथे तक्रारदार महिला तिच्या वयोवृद्ध आई आणि भावासोबत राहते. त्यांचा दुबई येथे स्वतचा व्यवसाय होता. काही वर्षांपूर्वी त्यांची जयेशसोबत ओळख झाली होती. त्यांच्या बंगल्याच्या खरेदी-विक्री व्यवहारात जयेशने मध्यस्थी करून तो बंगला विकत घेण्याचे ठरविले होते. त्यातून त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. जयेश हा बिल्डरने असल्याने त्याने त्याच्या काही प्रोजेक्टसाठी त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली होती.

logo
marathi.freepressjournal.in