पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अनेकदा दोन्ही कुटुंबियांनी त्याच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अब्दुलने तिच्यासोबत संसार करण्यास नकार दिला
पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Published on

मुंबई : पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह दोघांविरुद्ध आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अस्लम इमाम कांडे आणि तब्बसुम अब्दुल करीम शेख अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर तेहमिना अस्लम कांडे या महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

तेहमिना हिचा अस्लमसोबत आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर तिचे पतीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद सुरु होते. ती जाडजूड असल्याने तो तिला शरीरावर तसेच तिच्या कपड्यावरून सतत टोमणे मारत होता. त्याला तिची नणंद तब्बसूम हीदेखील साथ देत होती. त्यातून त्यांच्यात सतत खटके उडत होते. अनेकदा दोन्ही कुटुंबियांनी त्याच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अब्दुलने तिच्यासोबत संसार करण्यास नकार दिला होता.

पतीकडून होणारे मानसिक व शारीरिक शोषण तसेच त्याने दुसरे लग्न केल्याच्या संशयावरून तिने बुधवारी १४ फेब्रुवारीला आईच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

logo
marathi.freepressjournal.in