कर्जाच्या नावाने बँकेची २.३४ कोटींची फसवणूक

खासगी बँकेची २ कोटी ३४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. त्यात चौदा कर्जदारासह बँकेच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कर्जाच्या नावाने बँकेची २.३४ कोटींची फसवणूक

मुंबई : कर्जाच्या नावाने एका खासगी बँकेची २ कोटी ३४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी १७ जणांविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यात चौदा कर्जदारासह बँकेच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या तिघांच्या मदतीने हा संपूर्ण घोटाळा झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. लाललु रामबिहारी शोमे, पूनम लालतू शोमे, बाबू हुसैन शेख, शाहीनबानो बाबू शेख, विनय चंद्रशेखर तिवारी, रिना प्रकाश पांडे, मंगेश शंकर भंडारे, मानसी मंगेश भंडारे, सुरेश रतीलाल दोशी, कल्पना सुरेश दोशी, पंकज मोहन तिवारी, ज्योती पंकज तिवारी, मालविका हिमांशू देसाई, हिमांशू हसमुखलाल देसाई, रवि राजेंद्र विश्‍वकर्मा, विनोद सिद्धू, महेंद्र मोकल अशी या १७ जणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनंत रामचंद्र आरोलकर हे कांदिवली येथे राहत असून, इक्विटास स्मॉल फायानान्स बँक लिमिटेडमध्ये एरिया लिगल मॅनेजर म्हणून काम करतात. या बँकेचे मुख्य कार्यालय बोरिवलीतील मेन कॉर्टर रोड येथे आहे. या बँकेत रवि विश्‍वकर्मा, विनोद सिद्धू आणि महेंद्र मोकल हे क्रेडिट टिममधील कर्मचारी आहेत. एप्रिल २०१६ रोजी लालतू शोमे व त्यांची पत्नी पूनम शोमे यांनी बँकेत त्यांच्या नालासोपारा येथे मालमत्ता गहाण ठेवून दहा लाखांच्या कर्जाची मागणी केली होती. सर्व कागदपत्रांची शहानिशा केल्यांनतर बँकेने त्यांना १७.५० टक्क्याच्या व्याजदराने दहा वर्षांसाठी दहा लाखांचे कर्ज दिले होते. कर्जाचे पाच हप्ते भरल्यानंतर त्यांनी बँकेचे हप्ते भरणे बंद केले होते. हा प्रकार निदर्शनास येताच बँकेच्या वतीने त्याची शहानिशा करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in