हिऱ्यांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

हिऱ्यांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

लाखो रुपयांचे हिरे घेऊन या हिर्‍यांचा परस्पर अपहार केल्याचे उघडकीस आले
Published on

मुंबई : सुमारे ४५ लाख रुपयांच्या हिऱ्यांचा अपहार केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हिरेन धनश्यामभाई सवानी आणि आनंद लोडालिया अशी या दोघांची नावे असून ते दोघेही गुजरातच्या अहमदाबाद आणि सुरतचे रहिवाशी आहेत. या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी आतापर्यंत अनेक हिरे व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अशोकभाई कानजीभाई अणघण यांची धुविषा जेम्स डायमंड नावाची एक कंपनी असून त्यांनी हिरेनला सुमारे ३० लाखांचे हिरे दिले होते. दोन तासांत हिरे खरेदी-विक्रीचा व्यवहार कळवून त्यांना पेमेंट करण्याचे आश्‍वासन हिरेनने दिले होते. मात्र तीन दिवस उलटूनही हिरेनने काहीच प्रतिसाद न दिल्याने त्यांनी बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हिरेन सवानी आणि आनंद लोडालिया या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणूकीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे. आतापर्यंतच्या पोलीस तपासात तपासात दोन्ही आरोपींनी या दोन हिरे व्यापार्‍यासह काकडिया इम्पेक्सचे विठ्ठलभाई काकडिया, त्रुषा जेम्सचे निकुजभाई नरसीभाई गोटी, सुरज जेम्सचे प्रविणभाई नरसीभाई लुखी यांच्याकडूनही लाखो रुपयांचे हिरे घेऊन या हिर्‍यांचा परस्पर अपहार केल्याचे उघडकीस आले.

logo
marathi.freepressjournal.in