बोगस दस्तावेज प्रकरणी जामीनदार राहिलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

प्रसाद शंकर सावंत हे ठाणे येथे राहत असून, माझगाव कोर्टात शिरस्तेदार म्हणून कामाला आहेत.
बोगस दस्तावेज प्रकरणी जामीनदार राहिलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : जामीनदार म्हणून बोगस माहितीसह दस्तावेज सादर करुन माझगाव कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी कैलास भगवान संगारे या ४१ वर्षांच्या व्यक्तीविरुद्ध भायखळा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. प्रसाद शंकर सावंत हे ठाणे येथे राहत असून, माझगाव कोर्टात शिरस्तेदार म्हणून कामाला आहेत. पाच वर्षांपूर्वी नागपाडा पोलिसांनी पिटाच्या एका गुन्ह्यांची नोंद करून रियाज अहमद शेख या आरोपीस अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याच्या वतीने त्याचे वकिल आजम शेख यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. यावेळी त्याला माझगाव कोर्टाने जामीन मंजूर केला होता. जामीनदार म्हणून आजम शेख यांनी कैलास संगारे याचे रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड आणि नोकरीचे आयडी, इलेक्ट्रीक बिल आणि उत्पन्नाचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर तो ठाण्यात राहत असताना त्याने त्याच्या भावाचा राहण्याचा पत्ता दिला होता. तसेच त्याने रिद्धी सिद्धी केमिस्टमध्ये सेल्समनचे काम करत असल्याचे नमूद केले होते; मात्र तिथे चौकशी केल्यानंतर तो तिथे काम करत नसल्याचे उघडकीस आले होते. त्याने दिलेले आयडी कार्ड बोगस होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in