३.८५ कोटीच्या अपहारप्रकरणी संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

३.८५ कोटीच्या अपहारप्रकरणी संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबईतील कार्यालयाची जबाबदारी त्यांनी रतीश आणि बिपीन मेहता यांच्याकडे सोपविली होती. तीन वर्षांपूर्वी व्यवहार कमी झाल्याने रतीशला संचालक पदावरून काढून टाकण्यात आले.

मुंबई : अंधेरीतील एका खासगी कंपनीच्या ३ कोटी ८५ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी कंपनीच्या माजी संचालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. रतीश तावडे असे या संचालकाचे नाव असून पदावर नसताना त्याने कंपनीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अंधेरीतील देवांग नवीनकुमार गांधी यांच्या मालकीच्या खासगी कंपनीचा मुंबईसह इंग्लंड, जर्मनी आणि बेल्जियम देशात व्यवसाय चालतो. लंडन येथे कंपनीचे मुख्य कार्यालय असून याच कार्यालयातून ते सर्व आर्थिक व्यवहार चालवतात. मुंबईतील कार्यालयाची जबाबदारी त्यांनी रतीश आणि बिपीन मेहता यांच्याकडे सोपविली होती. तीन वर्षांपूर्वी व्यवहार कमी झाल्याने रतीशला संचालक पदावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतरही आपण संचालक असल्याचे भासवून बँकेत व्यवहार करत होता. अशाप्रकारे त्याने त्याच्या वैयक्तिक बँक खात्यात ३ कोटी ८५ लाख ८५ हजार १८७ रुपये ट्रान्स्फर केले होते. हा प्रकार उघडकीस येताच, एमआयडीसी पोलिसांत तक्रार करण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in