४० लाखांच्या अपहारप्रकरणी कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

नियती शहा आणि सम्राटसिंग गुप्ता या दोघांवर विम्याचा पैशांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
४० लाखांच्या अपहारप्रकरणी कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : सुमारे ४० लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी एका खासगी कंपनीच्या दोन संचालकाविरुद्ध साकिनाका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. विम्याचा पैशांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केल्याचा या दोघांवर आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले. नियती शहा आणि सम्राटसिंग गुप्ता अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अशोक रामहक यादव यांचा भागीदारीमध्ये आयटी सर्व्हिस सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांची अंधेरी परिसरात एक खासगी कंपनी असून, त्यांच्या कंपनीकडून ग्राहकांना महागड्या लॅपटॉप आणि मोबाईलची विक्री केली जाते. या मोबाईलसह लॅपटॉपचे ते विमा काढून देतात. जून २०२१ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत कंपनीने ४४३ ऍपल व डेल कंपनीचे लॅपटॉप आणि सोळा आयफोनची विक्री करताना ग्राहकांकडून मोबाईलसह लॅपटॉपचे विम्यासाठी ३७ लाख ४० हजार रुपये घेतले होते. ही रक्कम विम्यासाठी त्यांच्या परिचित शॉट मॉरमेट डिजीटल प्रोडक्शन लिमिटेडचे संचालक असलेल्या नियती शहा आणि सम्राटसिंग गुप्ता यांच्या कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आले होते.

तसेच कंपनीकडे रिपेरिंगसाठी आलेल्या सुमारे तीन लाखांचे पेमेंट संबंधित कंपनीला या दोघांकडून येणे बाकी होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कंपनीकडे विमा काढल्याचे पुरावे मागितले जात होते. मात्र वांरवार विचारणा करुनही नियती आणि सम्राटसिंग यांनी मोबाईलसह लॅपटॉपच्या विम्यासंदर्भातील कागदपत्रे त्यांना दिले नव्हते.

logo
marathi.freepressjournal.in