मेकमाय ट्रिपच्या तोतया कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

स्वस्तात विमान तिकिट देतो, असे सांगून ही फसवणुक केली
मेकमाय ट्रिपच्या तोतया कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : श्रीलंका टुरसाठी विमानाचे बोगस तिकिट व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करून तिकिटासाठी दिलेल्या पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी मेक माय ट्रिप कंपनीच्या एका तोतया कर्मचाऱ्याविरुद्ध समतानगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. सागर वशिष्ट असे या आरोपीचे नाव असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. कांदिवली येथे राहणारा किर्तीकुमार दत्तात्रय राजे हा ट्रॅव्हल्स एजंट म्हणून काम करतो. त्याची श्रीलंकेत आर्या टुर्स ऍण्ड ट्रॅव्हेल्स नावाची एक कंपनी असून, या कंपनीत त्याच्यासोबत इतर दोन भागीदार आहेत. ही कंपनी श्रीलंका देशात टूरचे आयोजन करते. काही दिवसांपूर्वी कंपनीने २४ लोकांच्या एका ग्रुपसाठी श्रीलंका टूरचे आयोजन केले होते. त्यासाठी कंपनीने नोव्हेंबर २०२२ रोजी सागर वशिष्ठ याच्याकडे कमी दरात विमान तिकिट बुक करण्यासाठी दिले होते. त्यांच्या सांगण्यावरून या २४ जणांनी सागरकडे त्यांच्या पासपोर्टची माहिती देऊन त्याला विमान तिकिटासाठी पैसे ट्रान्स्फर केले होते. अशाप्रकारे सागरने मेक माय ट्रिपचा कर्मचारी असल्याची बतावणी करून त्यांना स्वस्तात विमान तिकिट देतो, असे सांगून ही फसवणुक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in