हेव्ही डिपॉझिट अपहारप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

दिलेल्या मुदतीत दुकानाचा दाबा न दिल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले
हेव्ही डिपॉझिट अपहारप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : दुकान भाड्याने देण्यापूर्वी एका व्यापाऱ्याकडून हेव्ही डिपॉझिट म्हणून १५ लाख रुपये घेऊन फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या व्यापार्‍याच्या तक्रारीवरुन सांताक्रुज पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. सुरेश देवजी गामी, बच्चू वाविया आणि आलमगीर शेख अशी या तिघांची नावे असून या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. सांताक्रूझ येथील तक्रारदाराला आपल्या मुलीसाठी चष्म्याचे दुकान उघडण्यासाठी भाड्याचे दुकान हवे होते. त्यासाठी सुरेश यांचे रॉयल हॉटेल, निमा मंझिल इमारतीमधील दुकान भाड्याने घेण्यासाठी तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने सुरेश, बच्चू आणि आलमगीर यांना १५ लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत दुकानाचा दाबा न दिल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

logo
marathi.freepressjournal.in