लाचप्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

लाचेची मागणी केल्याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात पूर्वी कार्यरत असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला आहे.
लाचप्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : लाचेची मागणी केल्याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात पूर्वी कार्यरत असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कालेकर, पोलीस निरीक्षक अरविंद घाग आणि महिला पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली मांडे यांचा समावेश आहे. कोर्टाच्या आदेशावरून या तिन्ही अधिकाऱ्यांवर पाच लाखांची लाच मागून सव्वादोन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. बोरिवलीत राहणाऱ्या तक्रारदार महिलेने पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्या पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. त्यावेळेस या तिघांनी तक्रारदार महिलेकडे पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी तिच्याकडून सव्वादोन लाखांची लाच स्वीकारली होती. याप्रकरणी तिने कोर्टात एक याचिका सादर करून या तिन्ही आरोपीविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. या याचिकेवर अलीकडेच सुनावणी पूर्ण होऊन कोर्टाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तपासाचे आदेश दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in