सव्वासहा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अंधेरीतील वर्सोवा परिसरातील असलेला एक फ्लॅट दाखविला होता
सव्वासहा लाखांच्या फसवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

मुंबई : अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका महिलेची सुमारे सव्वासहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. निर्माण बोले आणि जाहिदा कासमानी अशी या दोघांची नावे असून, त्यांच्यावर हेव्ही डिपॉझिटच्या पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. तक्रारदार महिलेने हेव्ही डिपॉझिटवर एक फ्लॅट भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान तिची कैलासशी ओळख झाली होती. त्याने तिला जाहिदाचा अंधेरीतील वर्सोवा परिसरातील असलेला एक फ्लॅट दाखविला होता. फ्लॅट पसंद पडल्याने त्यांच्यात सव्वासहा लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर हा फ्लॅट भाड्याने देण्याचे ठरले होते. यावेळी तिने तिचे सर्व दागिने विकून तिला सुमारे सव्वासहा लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांच्यात भाडेकरार झाला होता; मात्र दिलेल्या मुदतीत जाहिदासह कैलासने तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही विविध कारण सांगून फ्लॅटची चावी देण्यास टाळाटाळ करत होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने फ्लॅटबाबत चौकशी केली असता, तो फ्लॅट जाहिदाच्या मालकीचा नसल्याचे उघडकीस आले. या दोघांनी याच फ्लॅटसाठी इतर कोणाकडून पैसे घेतले आहेत का ? याचा आता पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in