ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालावरून शिंदे गट व ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना याच मतदारसंघातील मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मतमोजणी केंद्रात विनापरवानगी प्रवेश केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस व त्यांच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल
X
Published on

मुंबई : उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील निकालावरून शिंदे गट व ठाकरे गटामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना याच मतदारसंघातील मतमोजणीच्या दिवशी नेस्को येथील मतमोजणी केंद्रात विनापरवानगी प्रवेश केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस व त्यांच्या सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेना उमेदवार रवींद्र वायकर यांचा विजय झाला. पण त्यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याप्रकरणी मतमोजणी केंद्रात ईव्हीएमशी संबंधित एक मोबाईल वापरल्याप्रकरणी रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ठाकरे गटाचे विधान परिषदेचे सदस्य विलास पोतनीस व त्यांच्या सुरक्षारक्षकावर वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे ठाकरे व शिंदे गटातील संघर्ष अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in