दहा लाखांच्या हिऱ्यांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल

दहा लाख रुपयांच्या हिऱ्यांच्या अपहारप्रकरणी दिलीप चिमणलाल शहा या हिरे दलालाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे
दहा लाखांच्या हिऱ्यांच्या अपहारप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : दहा लाख रुपयांच्या हिऱ्यांच्या अपहारप्रकरणी दिलीप चिमणलाल शहा या हिरे दलालाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. राजेश मन्हरलाल शहा हे बोरिवली परिसरात राहत असून, ते वांद्रे येथील जनम डायमंड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत २२ वर्षांपासून नोकरी करतात. त्यांच्यावर हिरे व्यापाऱ्यांसह दलालांच्याा मागणीनुसार हिरे देणे, त्यांच्याकडून पेमेंट वसूल करण्याची जबाबदारी आहे.

याच दरम्यान त्यांची दिलीप शहाशी ओळख झाली होती. त्याने सुरतसह दुबई आणि इतर राज्यातील हिरे व्यापारी त्याच्या संपर्कात असल्याने सांगितले होते. त्यांच्या हिऱ्यांना चांगली किंमत मिळवून देतो, असे सांगून त्याने राजेश शहाचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.

१५ एप्रिल रोजी त्याने त्यांच्याकडे काही हिर्‍यांची मागणी केली होती; मात्र हिरे घेण्यासाठी तो आला नाही, त्याने निलेश रमनलाल शहा याला त्यांच्या कार्यालयात पाठविले होते. त्याच्या सांगण्यावरुन राजेश शहा यांनी निलेशला सुमारे दहा लाखांचे हिरे क्रेडिटवर दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in