शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने २५ लाखांची फसवणूक

शेअरमध्ये ऑनलाईन सर्च करताना त्यांना एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज करून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीवर १५ ते २० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या सांगण्यावरून जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यांत ९ लाख ६१ हजारांची गुंतवणूक केली होती; मात्र त्याला कुठलाही परतावा न देता त्याने त्यांची फसवणूक केली होती.
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने २५ लाखांची फसवणूक

मुंबई : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सुमारे २५ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी मुलुंड आणि ओशिवरा पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. यतिन गुलाबचंद गुडका आणि त्याची पत्नी मित्तली यतिन गुडका याच्यासह अन्य एका अज्ञात व्यक्तीचा आरोपींमध्ये समावेश आहे. ठाणे येथे राहणाऱ्या तक्रारदाराचा भांडुप येथे स्वत:चा व्यवसाय आहे. यतिन हा त्यांच्या शाळेचा मित्र असून, २०१८ साली त्यांनी त्याच्यासोबत पुन्हा भेट झाली होती. या भेटीत त्याने तो शेअर मार्केटमध्ये काम करत असून, त्याने आतापर्यंत अनेकांचे पैसे शेअरमध्ये गुंतवणूक करून त्यांना चांगला परतावा मिळवून दिला आहे. त्याची एक खासगी कंपनी असून, या कंपनीच्या माध्यमातून तो शेअरमध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्याकडे १५ लाखांची गुंतवणूक केली होती; मात्र त्यांना सहा महिन्यांनंतर कुठलाही परतावा दिला नाही. त्याने दिलेले सर्व धनादेश बँकेत न वटता परत आले होते. चौकशीदरम्यान यतिन व त्याची पत्नी मित्ताली यांनी त्यांच्यासह इतर काही लोकांची अशाच प्रकारे फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते.

त्यामुळे त्यांनी मुलुंड पोलिसात या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. दुसऱ्या घटनेत एका ३१ वर्षांच्या तरुणाची अज्ञात व्यक्तीने साडेनऊ लाखांची फसवणूक केली होती. शेअरमध्ये ऑनलाईन सर्च करताना त्यांना एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज करून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीवर १५ ते २० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्या सांगण्यावरून जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यांत ९ लाख ६१ हजारांची गुंतवणूक केली होती; मात्र त्याला कुठलाही परतावा न देता त्याने त्यांची फसवणूक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in