आठ वर्षीय मुलीवर शाळेतच लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच शाळेच्या शिपायाला अटक

सांताक्रुझ येथील एका शाळेत पीडित मुलगी तिसरीत शिकते. याच शाळेत आरोपी शिपाई म्हणून काम करत होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता.
आठ वर्षीय मुलीवर शाळेतच लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच शाळेच्या शिपायाला अटक

मुंबई : आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिपायानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना सांताक्रुझ परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी शिपायाला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सांताक्रुझ येथील एका शाळेत पीडित मुलगी तिसरीत शिकते. याच शाळेत आरोपी शिपाई म्हणून काम करत होता. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. तिला मारहाण करून त्याने ‘हा प्रकार कोणालाही सांगू नकोस’, अशी धमकी दिली होती. भीतीपोटी तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतर त्याने तिच्यावर मार्चपर्यंत अनेकदा लैंगिक अत्याचार केला होता. या मुलीला त्रास होऊ लागल्याने तिच्या पालकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले होते. तिथे वैद्यकीय चाचणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले होते. तिची चौकशी केल्यानंतर शाळेतच शिपायाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात शिपायाविरुद्ध तक्रार केली होती. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in