मुंबईतील धक्कादायक घटना, सहाय्यक पोलीस निरीक्षकानेच केला विवाहितेचा लैंगिक छळ; गुन्हा दाखल

याबाबतची तक्रार वरळी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मुंबईतील धक्कादायक घटना, सहाय्यक पोलीस निरीक्षकानेच केला विवाहितेचा लैंगिक छळ; गुन्हा दाखल

विशाल सिंह/मुंबई : एका ३२ वर्षीय महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गौरव शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गौरव शिंदे हे राज्य गुप्तचर विभागात कार्यरत आहेत. शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, सत्र न्यायालयाने त्यांना हंगामी दिलासा दिला आहे.

आरोपी गौरव शिंदे राहत असलेल्या इमारतीत ही तक्रारदार महिला राहते. याबाबतची तक्रार वरळी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तक्रारदाराने सांगितले की, ती ८ वर्षांच्या मुलाला घेऊन बसस्टॉपवर उभी होती. तेव्हा आरोपी शिंदे हे तेथे उपस्थित होते. तुमच्या मुलाला मी पोलीस जलतरण तलावात ॲॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून त्यांनी तिला फोन क्रमांक घेतला. त्यानंतर ते तिला फोन व मेसेज करू लागले. मात्र, तिला ते आवडत नव्हते. तिने त्यांचा क्रमांक ब्लॉक केला. त्यानंतरही शिंदे हे तक्रारदार महिलेचा पिच्छा पुरवत होते. ते तिला फोन अनब्लॉक करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यानंतर तिने त्यांचा नंबर अनब्लॉक केला.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मार्च २०२० मध्ये देशात लॉकडाऊन लागला तेव्हा तक्रारदार महिला आपल्या पतीसोबत गावाला गेली. तेव्हा आरोपी शिंदे तिला फोन व मेसेज करत होते. त्यानंतर तिने पुन्हा त्यांचा क्रमांक ब्लॉक केला. एके दिवशी आरोपीने तिला मेसेज करत सांगितले की, मी साताऱ्याला आलो असून तुला व्हिडीओ कॉलने अजिंक्यतारा किल्ला दाखवायचा आहे. व्हिडीओ कॉलवरून मला तुझे गाव दाखव, अशी मागणी त्यांनी तक्रारदार महिलेला केली. त्यानंतर तुझे कपडे काढ, अशी मागणी केली. तिने त्यांना नकार दिला.

जेव्हा लॉकडाऊन उठला तेव्हा तक्रारदार महिलेचा पती पुन्हा मुंबईला आला. जेव्हा पती व मुलगा बाहेर गेलेले असताना आरोपी शिंदे तिच्या घरात घुसले व तिच्या शरीराला स्पर्श करू लागले. तेव्हा पीडितेने त्यांना विरोध केला. तेव्हा शिंदेनी तिला मोबाईलमध्ये घेतलेले स्क्रीनशॉट दाखवले. तू विरोध केल्यास तुझ्या पतीला तुझे फोटो दाखवीन, अशी धमकी त्यांनी तिला दिली. त्यानंतर आरोपी शिंदेनी तिचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तक्रारदार महिलेने सप्टेंबरमध्ये पोलिसांकडे तक्रार दिली.

logo
marathi.freepressjournal.in